Jump to content

बोईंग ७३७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बोईंग ७३७-८०० या पानावरून पुनर्निर्देशित)
बोईंग ७३७

एर बर्लिनचे बोईंग ७३७-८००

प्रकार मध्यम पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे दोन इंजिनांचे जेट विमान
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक बोईंग
पहिले उड्डाण ९ एप्रिल, इ.स. १९६७
समावेश १० फेब्रुवारी, इ.स. १९६८ (लुफ्तांसा)
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
मुख्य उपभोक्ता साउथवेस्ट एअरलाइन्स, रायनएर, वेस्टजेट एअरलाइन्स, अमेरिकन एअरलाइन्स, इ.
उत्पादन काळ १९६६ - सद्य
उत्पादित संख्या ८,७२५ (सप्टेंबर २०१५)
प्रति एककी किंमत ३ कोटी २० लाख (-१००), ५ कोटी ९४ लाख (-६००), ७ कोटी ८३ लाख (-७००), ९ कोटी ३३ लाख (-८००), ९ कोटी ९० लाख (-९००ईआर)
उपप्रकार बोईंग टी-४३

बोईंग ७३७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.

नियमितपणे उत्पादित प्रवासी विमानांत बोईंग ७३७ प्रकारच्या विमानांची संख्या सर्वाधिक आहे.

उपप्रकार

[संपादन]

या विमानाचे अनेक उपप्रकार आहेत -

  • बोईंग ७३७
  • बोईंग ७३७-१००
  • बोईंग ७३७-२००
  • बोईंग ७३७-३००
  • बोईंग ७३७-४००
  • बोईंग ७३७-५००
  • बोईंग ७३७-६००
  • बोईंग ७३७-७००
  • बोईंग ७३७-८००
  • बोईंग ७३७-९००ईआर
  • बोईंग ७३७-मॅक्स ७
  • बोईंग ७३७-मॅक्स ८

यांपैकी -७००, -८०० आणि -९००ईआर उपप्रकार सध्या उत्पादनात आहेत तर ७३७ मॅक्स उपप्रकार २०१७मध्ये तयार करण्यास सुरुवात होईल.

या विमानाचा पहिला उपप्रकार -१०० फेब्रुवारी १९६८ पासून सेवारत आहे. लुफ्तांसाने या प्रकारचे विमान सगळ्यात आधी आपल्या ताफ्यात समाविष्ट केले होते.[][]

त्यानंतर एक वर्षाने -२०० उपप्रकार सेवेत आला. १९८० च्या दशकात बोईंगने -३००, -४०० आणि -५०० उपप्रकार बाजारात आणले. -५०० पर्यंतचे हे उपप्रकार ७३७ क्लासिक नावानेही ओळखले जातात. १९९० च्या दशकात बोईंगने -६००, -७००, -८०० आणि -९००ईआर हे उपप्रकार आणले. यांना ७३७ नेक्स्ट जनरेशन नावानेही ओळखतात.

प्रतिस्पर्धी विमाने

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Kingsley-Jones, Max. "6,000 and counting for Boeing’s popular little twinjet." Flight International, Reed Business Information, April 22, 2009. Retrieved: April 22, 2009.
  2. ^ "The Boeing 737-100/200." Airliners.net, Demand Media, Inc. Retrieved: April 22, 2009.
pFad - Phonifier reborn

Pfad - The Proxy pFad of © 2024 Garber Painting. All rights reserved.

Note: This service is not intended for secure transactions such as banking, social media, email, or purchasing. Use at your own risk. We assume no liability whatsoever for broken pages.


Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy