नवरंग (पक्षी)
शास्त्रीय नाव |
(Pitta brachyura) |
---|---|
कुळ |
(Ardeidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश |
इंडियन पिटा (Indian Pitta) |
नवरंग (मराठी, हिंदी) म्हणजे भारतीय पिटा (इंग्रजी : Indian Pitta), (शास्त्रीय नाव : Pitta brachyura brachyura). या पक्षाची अन्य मराठी नावे बहिरा पाखरू, बहिरा, बंदी, खाटिक, गोळफा, पाऊसपेव, पाचापिल अशी आहेत.
- कन्नड नावे :पित्त, नेल्गुप्प म्हणतात.
- गुजराती नावे : नवरंग, हरियो
- तेलुगू नावे : पालान्की पितट, पोन्नगी
- संस्कृत नावे : पद्मापुष्प, पिकाद्द, भारत पद्मापुष्प
- हिंदी नावे : चरचरी, नवरंग, नोरंग, रुगेल
आढळस्थान
[संपादन]हा पक्षी भारतभर सर्वत्र दिसतो. तो भारतातील सर्व वनांत आणि झुडपी वनांत आढळतो व त्याच्या विणीच्या काळात म्हणजे, मे ते ऑगस्ट या काळात दिसतो.
नवरंग पक्षाचे वर्णन
[संपादन]पक्षातील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. त्यांच्यात निळा, हिरवा, काळा, पांढरा, तांबडा हे भडक रंग प्रामुख्याने दिसतात. हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असू भुंड्या शेपटीचा आहे. त्याचा पोटाखालचा व शेपटीखालचा रंग किरमिजी असतो. नवरंग पक्षी उडताना पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात.
प्रजनन काळ
[संपादन]नवरंगाच्या विणीचा काळ मे ते ऑगस्ट असून गवत, झाडांचे मूळ, काड्या यापासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते.
खाद्य
[संपादन]विविध प्रकारचे कीटक हे नवरंगाचे खाद्य आहे.
वैशिष्ट्य
[संपादन]झुडपी जंगलात राहणे अधिक पसंत करणारा हा पक्षी आपला बहुतेक वेळ जमिनीवर घालवतो. त्याचा व्हीट – ट्यू असा आवाज सकाळ संध्याकाळ ऐकू येतो. हा ढगाळ हवेत दिवसभर आवाज करतो.
चित्रदालन
[संपादन]-
गुहागर, महाराष्ट्र, भारत येथील विणीच्या हंगामातील नवरंग पक्षी
बाह्य दुवे
[संपादन]- पक्ष्यांची मराठी नावे (१) Archived 2015-05-12 at the Wayback Machine.
- Bird Names (English-Marathi)
- पक्ष्यांची मराठी नावे (२) Archived 2015-09-16 at the Wayback Machine.
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/7/7d/Pitta_brachyura.jpg
संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |