Content-Length: 91858 | pFad | https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8

वॉरेन वॉशिंग्टन - विकिपीडिया Jump to content

वॉरेन वॉशिंग्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वॉरेन वॉशिंग्टन (२८ ऑगस्ट, १९३६: पोर्टलँड, ओरेगॉन, अमेरिका - ) हे अमेरिकन हवामान शास्त्रज्ञ असून ते सध्या नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फिअरिक रिसर्च, बोल्डर, कॉलोराडो येथे वयाच्या ८३ व्या वर्षीही कार्यरत आहेत.[]

जन्म व शिक्षण

[संपादन]

वॉरेन वॉशिंग्टन यांचा जन्म २८ ऑगस्ट १९३६ला अमेरिकेतील पोर्टलँड, ओरेगॉन, येथील आफ्रिकन-अमेरिकन कुटुंबात झाला. वॉशिंग्टन यांनी ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीतून भौतिकशास्त्रात पदवी व हवामानशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी मधून १९६४ साली हवामानशास्त्रात पीएच.डी मिळवली.

कार्य

[संपादन]

पर्यावरण विज्ञान व हवामान संशोधन या विषयांत डॉ. वॉशिंग्टन तज्ञ आहेत व पृथ्वीचे हवामान व त्याची कॉम्प्युटर सिम्युलेशन मॉडेल्स बनवणे या विषयांत त्यांचा खास अभ्यास आहे. वॉशिंग्टन यांनी अनेक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पर्यावरण विषयक सल्लागार म्हणून काम केले आहे. टोकाच्या पर्यावरणीय घटनांचा संबंध व त्यांची वाढण्याची शक्यता वॉशिंग्टन यांची मॉडेल्स स्पष्ट करतात. हवामानशास्त्रातील हा महत्त्वाचा विकासाचा टप्पा वॉशिंग्टन यांच्या संशोधनामुळे शक्य झाला आहे.

पुरस्कार

[संपादन]

वॉरेन वॉशिंग्टन यांना २००७ साली शांततेचे नोबेल पारितोषिक आयपीसीसीच्या इतर शास्त्रज्ञांबरोबर विभागून देण्यात आले. २०१० मध्ये अमेरिकेतले विज्ञान क्षेत्रातले सर्वोच्च ‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स’ दिले गेले.[]२०१९ मध्ये पर्यावरण क्षेत्रातील नोबेल मानला जाणारा टायलर पुरस्कार वैज्ञानिक मायकेल मॅन यांच्याबरोबर विभागून देण्यात आला.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "VITA - WARREN M. WASHINGTON" (PDF). http://www.cgd.ucar.edu. १० मार्च २०२० रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  2. ^ "NEW WARREN WASHINGTON MEDAL TO BE AWARDED BY AMS". https://news.ucar.edu. १० मार्च २०२० रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  3. ^ "THE TYLER PRIZE FOR ENVIRONMENTAL ACHIEVEMENT 2019" (PDF). https://tylerprize.org. १० मार्च २०२० रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)








ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy